Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Rakesh More

Romance Tragedy

3  

Rakesh More

Romance Tragedy

कळत नाही

कळत नाही

1 min
128


जिला मी पसंद नाही 

तिच्यावर प्रेम करतोय मी 

कळत नाही माहित असूनही 

तिच्यावर का मरतोय मी || 0 ||


वाटतं कधी तिच्या पासून 

दूर इतकं निघून जावं 

खुल्या डोळ्यांनीही तिचं 

स्वप्न ही न नयनी यावं 

दूर जाण्याच्या प्रयत्नात ही 

तिच्याकडेच सरतोय मी 

कळत नाही माहित असूनही 

तिच्यावर का मरतोय मी || 1 ||


काय असं करू मी 

तिला सहज जिंकून जावं 

हाच एक प्रयत्न का 

सतत मला देतो घाव 

तिला जिंकण्याच्या प्रयत्नात 

लाजिरवाणं हरतोय मी 

कळत नाही माहित असूनही 

तिच्यावर का मरतोय मी || 2 ||


Rate this content
Log in