कळी आहेस तु गुलाबाची...!
कळी आहेस तु गुलाबाची...!

1 min

33
अगं आता तरी जप स्वतः ला
कळी आहेस तु गुलाबाची
फुलणार आहेस तु एकदाची,
झुलु नकोस वाऱ्याच्या डौलाने
भुलु नकोस भुंग्यांच्या गुंजणाने
नजरेत आहेस तु गिधाडांच्या
वाट पाहतात ते केव्हाची
कळी आहेस तु गुलाबाची
फुलणार आहेस तु एकदाची
माळी बिचारा तुझी राखण करतो
फुलवण्यास तुला मरमर करतो
काट्यांना सोडून जाऊ नकोस
बालिशपणाने वागु नकोस,
संरक्षणास तुझ़्या उभे दिवसरात्र ते
विश्वास त्यांचा तोडू नकोस
अगं आता तरी जप स्वतः ला
झाली शहाणी गं तु
कळी आहेस तु गुलाबाची
फुलणार आहेस तु एकदाची...!