कळे तुजवरी कसे जडले मन
कळे तुजवरी कसे जडले मन
आज स्वप्नी माझ्या दिसले
सांगु कशी मी तुला रे,पण
अवचीत घडले...हे सारे
कळे तुजवरी कसे जडले रे मन
तुझ्या शब्दात का गुंतते हे मन
क्षणोक्षणा का येई तुझी आठवण
अशी बावरे,हरवते माझी मी पण
कळे तुजवरी कसे जडले रे मन
मिठीत घेता तू अंग मोहरे सारे
तुझ्या स्पर्शाने अधीर झाले मन
घायाळ झाले मनी घेता चुंबन
कळे तुजवरी कसे जडले रे मन
मारी नजरेचा तीर.. कमान
बाहुत घेत गोड गोड बोलून
स्वप्नी मी पाहे बेधुंद होऊन
कळे तुजवरी कसे जडले रे मन