Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Yogita Takatrao

Tragedy

3  

Yogita Takatrao

Tragedy

कलाकार

कलाकार

1 min
125


आयुष्याचा रंगमंच...

पात्र अगणित जिथे ,

चुरशीचे कला युद्ध 

स्मरणात राहे तिथे !......१


धडपड प्रत्येकाची...

पात्र वठवण्या नीट , 

कोऱ्या प्रश्नपत्रिकेत 

उत्तरांची ओळ धीट !......२


कधी मुखावर हर्ष....

आत पेटता निखारा ,

सुखावण्या दुसर्‍यांना

मनी दुःखाचा निवारा !....३


जन्म मृत्यूच्या मधले....

वेचे आनंदाचे क्षण , 

तोच कलाकार खरा

स्मरणात नसे धन !.......४


हाती येई शून्य तरी...

पराकाष्ठा प्रयत्नांची ,

जिंकलेल्या बाजी मध्ये

तोडमोड भावनांची !.......५


बहरल्या जीवनात....

धोका,धडा गुरु ठरे ,

चुकांतून नित्य पुढे

अनुभव गाठी भरे !........६


आहे दान श्वास, देह.....

रोज चाले कसरत ,

रंगभूमीवर नाव ,

छाप आपली कोरत !.......७


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy