Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Udgirkar

Inspirational Others

3  

Sanjay Udgirkar

Inspirational Others

किती म्हणजे पुरे रे

किती म्हणजे पुरे रे

1 min
917


किती म्हणजे पुरेसे असते रे.

कितीही मिळाले तरी मन का नाही भरत रे.

तुला समाधान का नाही वाटत रे.

तुला अजून खूप खूप काही हवेच आहे की रे.

किती म्हणजे पुरेसे असते रे.

तुझी हाव पाहून माझ्या उरात धडकी भरते रे.

मी म्हणतो आता हावरटपणा पुरे कर रे.

आता थोडे देवाचेही नाव घे की रे.

किती म्हणजे पुरेसे असते रे.

आता खोटे बोलणे आणि फसवणे पुरे रे.

शेवटी सगळे काही इथेच राहते रे.

आतापर्यंत कोणी काही आपल्याबरोबर नेले आहे का रे.

किती म्हणजे पुरेसे असते रे.

जगण्यासाठी किती थोडेसे हवे असते रे.

कधी याचाही विचार करून बघ ना रे.

फापटपसारा गोळा करतो की नाही रे.

किती म्हणजे पुरेसे असते रे.

हे आपले आपल्यालाच ठरवायचे असते रे.

दुसर्‍यांचे पाहून जगायचे नसते रे.

इथे एकाहून एक सरस आहेत रे.

किती म्हणजे पुरेसे असते रे.

आनंदी राहाण्यासाठी काहीच लागत नाही रे.

आपणही मरणार हे लक्षात ठेवले की काम झाले रे.

आपल्या चांगल्या आठवणी मागे ठेवून जाता येते ना रे.

किती म्हणजे पुरेसे असते रे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational