STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Horror Romance Tragedy

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Horror Romance Tragedy

खरं प्रेम...

खरं प्रेम...

1 min
0

खरं प्रेम 

' पुष्पाग्रज '


काय गुन्हा माझा तुम्ही सांगा मला ,
मी प्रेम केलं का पहावेना तुम्हाला...

माझ्या प्रेमाची या शपथ तुम्हाला ,
का करता विरोध तुम्ही खऱ्या प्रेमाला...

नसते जात,पात,धर्म
खऱ्या प्रेमाला ,
नका काढू डोळे माझे द्या दृष्टी मला...

जडला जीव माझा नाही पाहीली जात पात ,
माझी प्रियतमा देई जीव या जीवाला...

नका छळू मला, नको देऊ मला सजा,
घ्या धडा तुम्हीच,तो शिकवा जगाला...

नका काढू माझे डोळे,व्हा डोळस तुम्ही ,
अर्थ प्रेमाचा का नाही समजला कुणाला...

प्रेम खरं असतं, प्रेम नसतं खोटं,
खऱ्या प्रेमाचा अर्थ कळू द्या जगाला...

गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड 
९८३४२९८३१६


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror