Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shekhar Chorghe

Others

4  

Shekhar Chorghe

Others

खरा पाऊस कोण?

खरा पाऊस कोण?

1 min
13.8K


काल अचानक पाऊस आला ओसरीला माझ्या 

म्हणाला 

आजकाल ती दिसत नाही 

अन् तू ही 

पहिल्यासारखा भिजत नाही 

मी काय बोलणार?

न बोलताही त्याला सारं समजतं 

इतका ओळखतो मला तो 

माझ्या आतल्या वादळासह 

तो पुन्हा म्हणाला 

अरे बाहेर पड भिजून घे थोडंसं 

माझ्या नाही तर तुझ्याच पावसात क्षणभर तरी

ही वादळं सारखी सांगत असतात 

तुला थोडं तरी भिज म्हणून सांगायला 

रात्रभर बरसत असतो आतल्या आत 

कुणी बघू नये म्हणूनच ना 

बरस तू, बेधूंद कोसळ आभाळासारखं.

अता मी कोसळतोय एकटाच 

तिची वाट न बघता 

अन् अता त्याला प्रश्न पडलाय 

खरा पाऊस कोण?

तो आभाळातून पडणारा 

की मी 

रात्रभर पावसाला तेवत ठेवणारा 

'आभाळाशिवाय'...

       


Rate this content
Log in