खिडकीतला पाऊस
खिडकीतला पाऊस
तो खिकडीतला पाऊस आता मोकळ्या हवेमध्ये जावून झेलू दे..
मातीचा दरवळणारा सुगंध आता माझ्या पायांनाही लागू दे..
जुगारून सारे पाश आता मला मोकळा श्वास आता घेवू दे..
पहिला पाऊस सरला आता या पावसाची ओळख होऊ दे..
गरम वाफाळलेला चहा कुरकुरीत कांदा भजी मला खाऊ दे..
लहानपणीच्या गोड आठवणी आता तरी मला ताज्या करू दे..
ती छत्री घेऊन मला आता मनसोक्त भटकंती करून येऊ दे..
कशीही असेना मोकडी तिकडी कविता मला तरी सुचू दे..
भिजलेले केस मोकळे सोडून तुला माझ्यामध्ये सामवू दे..
एकटक पाहत असता तुला चिंब पावसात न्हाऊ गाऊ दे..
सगळ्यांची नजर चुकवून आता माझं मला म्हणून जगू दे..
काहीच क्षण आहेत जे मला कायमचे घर मनात माझ्या राहू दे..