कधीतरी मला तू शोधशील
कधीतरी मला तू शोधशील
तुला नाहीत आवडत फुलं
ना फुलांच्या पाकळ्या
नसेन मी जेव्हा, फुलांच्या गंधात
कधीतरी मला तू शोधशील
तुला नाही आवडत पाऊस
ना त्याची रिमझिम
नसेन मी जेव्हा, पावसाच्या थेंबात
कधीतरी मला तू शोधशील
तुला नाही आवडत चंद्र
ना त्या तारका
नसेन मी जेव्हा, पौर्णिमेच्या चंद्रात
कधीतरी मला तू शोधशील
तुला नाही आवडत समुद्र
ना खळाळत्या लाटा
नसेन मी जेव्हा, अथांग सागरात
कधीतरी मला तू शोधशील
तुला नाही आवडत कविता
ना भावनांची चारोळी
नसेन मी जेव्हा, मीच गुंफलेल्या शब्दांत
कधीतरी मला तू शोधशील
तुझ्या एकांतात, तुझ्या सावलीत
कधीतरी मला तू शोधशील