Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Aniket Kirtiwar

Others

3  

Aniket Kirtiwar

Others

कधी कधी

कधी कधी

1 min
2.1K


कधी कधी वाटते मला

की चांदण्यांच्या पंगतीत जाऊन बसावं

आज मी त्याला बघतो

कधी कुणी मलाही बघावं

कधी कधी वाटते मला....


काळोख्या रात्री, लखलखता प्रकाश

म्हणतो माझ्यावरतीही आहे आकाश

आपणंही असाच स्तंभ बनावं

रस्ता चुकलेल्याना वाट दाखवावं

कधी कधी वाटते मला....


चांदण्यांची किमया वेगळीचं

दूरून दिसतात एकत्र सगळीच

मनुष्यांनी तसंच एकत्र असाव

अंधारातही लख्ख हसावं

कधी कधी वाटते मला...


Rate this content
Log in