काय सांगू सजनी तुला....
काय सांगू सजनी तुला....




काय सांगू सजनी तुला,
मी तुझ्यावर कित्ती प्रेम केलं...
फसव्या प्रेमाच्या नादात,
तू खऱ्या प्रेमाला हृदयातून काढलं...
काय सांगू सजनी तुला,
तुझ्याविना मला एकटं-एकटं वाटायचं...
तू नसली तेव्हा मला,
कॉलेज मध्ये रमत नसायचं....
काय सांगू सजनी तुला,
तुझं हसणं मला लाख मोलाचं वाटायचं...
ठरवलोय एकदा करू आपलं प्रेम व्यक्त,
पण तुझ्या समोर बोलायचं धाडसच नसायचं......
काय सांगू सजनी तुला,
मी तुझ्यावर कित्ती प्रेम केलं...
नकाराच्या भीतीने,
एकटंच राहायचं ठरवलं.....