कारण काय
कारण काय
तुझं माझ्या जीवनात येण्याचं
कारण काय
गहाण ठेवलंय हृदय माझं
त्याचं तारण काय || 0 ||
काय असावं प्रयोजन
तुझं माझ्या जीवनात येण्याचं
काय असावं कारण
मला प्रेमाचं प्रलोभन देण्याचं
तुझ्यासाठी केलेलं रूप सखे
धारण काय
गहाण ठेवलंय हृदय माझं
त्याचं तारण काय || 1 ||