Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

गीता केदारे

Others

5.0  

गीता केदारे

Others

काळीजमाया...

काळीजमाया...

1 min
341


मिळाला निवांत वेळ

आज मायलेकराला

शेकोटीच्या ऊबेपुढे

भावे मायेची ऊब लेकराला...


चेहऱ्यावरील प्रसन्नता

मोहून टाके मनाला

जिव्हाळ्याचे भाव आले

आज पहा शेकोटीला...


मायलेकराच्या गुजगोष्टी

मोल नसे त्याला कोणतेच

अंतरीच्या भावनांना

काळीजमाया असतेच...


आईला मिळाया शेक 

लेकराने केली शेकोटी

आई लेकराच्या प्रेमाला 

कधीच ना येवो ओहोटी... 


आई जपे लेकराला 

आईशी नाळ लेकराची 

काळजातून शिंपडते माया

प्रतिबिंबित अस्तित्वाची... 


Rate this content
Log in