Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Abasaheb Mhaske

Romance

3  

Abasaheb Mhaske

Romance

का मग आठवते रात्रंदिनी आजही ?

का मग आठवते रात्रंदिनी आजही ?

1 min
246


हीच का ती पहिल्या भेटीत

मनापासून आवडलेली ,खास

प्रेम होत कि केवळ आकर्षण

भ्रम होता की ,केवळ भास ?


परिस्थितीशी तू जुळवून घेतले

का मग मी अस्वस्थ ,अधांतरी

तू गेलीस , परकी झालीस 

का मग आठवते रात्रंदिनी आजही ?


बोलताना बोल तुझे अडखळले कसे

क्षणात झाले का म्हणून निरर्थक सारे ?

कंठ दाटला , श्वास कोंडला जणू

जीवघेना खेळ मांडला जगण्याचा


भोगण्याची भोग सारे

हात जोडोनि दुःख उभे

झेलताना विरह , वेदना

लाभते कशी अज्ञात शक्ती


अर्थ न उरला आता ,त्या नात्याला 

कळले मज जेंव्हा , मुळासकट उपटून

फेकून द्याव्यात वाटले न कधी का ?

आठवणी त्या जीवघेण्या , हव्याहव्याशा


Rate this content
Log in