जरा पडू दे पाऊस
जरा पडू दे पाऊस
काळ्या ढगामाजी, वीज नाचते नभात।
जरा पडू दे पाऊस, माझ्या, घराच्या दारात।।धृ।।
वाऱ्या सांगे निघे कशी, मेघांची वरात।
इंद्रधनुची आरास, आकाशाच्या अंगणात।।१।।
थेंब थेंबातून कसा, मेघ पाझर शेतात।
रिमझिम पावसाची, आता कर बरसात।।२।।
शालू नेसून हिरवा,लता-वेली परसात।
फुले मोत्याचे कणीस, माझ्याच शेतात।।३।।
आधी पडू दे पाऊस, माझ्या कोरड्या शेतात।
मग पडू दे रानात, दरी-खोरी डोंगरात।।४।।
जरा पडू दे पाऊस, नदी-नाले धरणात।
मग रानात वनात, बरसू दे शहरात।।५।।