जलधारा
जलधारा
थाबंल्या जलधारा थाबंला तो वारा
आता कशास शोधू कोठे मी निवारा
चिंब चिंब भिजून मोहरले माझे अंग
धरतीने भिजून बदलले सारे तिचे रंग
भिजलेल्या मातीतून ओहळ ते फुटावे
थबकलेल्या पाण्याने खळखळते हसू लुटावे
हिरवे कोंब आसुसुन धरतीवर उमलावे
थरथरत्या वार्यासोबत कळ्यांनी फुलावे
तरीही भिजण्याची गम्मत असे निराळी
सरीवर सरी धावत येती पावसाळी