जखमांचा हार
जखमांचा हार
देवा तु कुष्ठरोग्यांना
दिला जखमांचा हार
अपमान वेदनांनी
झाले जीवनी बेजार
झाले आप्तच परके
वाली नव्हते तयांना
सेवा बाबा आमटेंची
मनी होती संवेदना
जागविला स्वाभिमान
वसा सेवेचा घेतला.
झिजविली काया नित्य
झरा दु:खाचा आटला
हार जखमांचा झाला
आला आनंद बहार
देव माणसी पाहिला
सेवा केली खरोखर
आहे आदर्श जगाला
आज हे आनंदवन
स्वाभिमान सेवाधर्म
सुखावतो मनोमन