Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vimal Patkari

Others

4.0  

Vimal Patkari

Others

जीवनदाता पाऊस

जीवनदाता पाऊस

1 min
289


गीत जीवनाचे गाण्या रिमझिम झाली बरसात 

सतार जलदांची छेडुनी जीवन घेवुनी आलास !!

साद माझी रे ऐकून सखया आलास धावून

मंद धुंद मृदगंधानं मोहक रे झालं मन 

इंद्रधनुचे रे रंग मिसळले जीवनात !!

गुदमरलेल्या या जीवा होता तुझाच रे ध्यास

गार गार स्पर्शानं झाला मोकळा हा श्वास

सारा हरित हा साज लेऊन नटली रे आज !!

आगमनानं तुझिया चराचर सुखावलं

सहवासानं तुझिया मन सजलं सजलं 

अशा भेटीची पर्वणी लाभू दे रे दे आजन्मा !!


Rate this content
Log in