जीवनाच्या प्रवासात..
जीवनाच्या प्रवासात..
जीवनाच्या प्रवासात
एखादी सल
कायम बोचत
असते मनाला....
कारण घाव असतात
इतके खोल, एखाद्या
गोचडीसारखे घट्ट
मनाला चिकटलेले....
तेव्हा असह्य
होतात वेदना
ज्या स्पष्ट होत नाहीत,
का व्यक्त ही होत नाहीत....
मग त्या भावना
मनात घरट्या घालतात,
घाव जरी भरले तरी,
व्रण तसेच राहतात...