STORYMIRROR

Sarika Jinturkar

Inspirational

3  

Sarika Jinturkar

Inspirational

जीवन एक सुंदर प्रवास

जीवन एक सुंदर प्रवास

1 min
374

 जीवन एक सुंदर प्रवास  

    त्याला नात्यांचा सहवास  

   कित्येक माणसं भेटतात रोजचं, 

   अनुभवही मिळतो खास..☺️

 पण...

जीवनाच्या या प्रवासात आपण रोजचं धडधडतोय,

 मित्र-मैत्रिणी च्या आठवणीत बालपण चाळतोय,

 स्वार्थी या जगात निःस्वार्थपणे सुख कुरवाळतोय,

 त्रासलेल्या चेहऱ्यावर हसू शोधतोय,

 आयुष्याच्या स्पर्धेत रोजच पळतोय..🏃‍♂️🏃‍♀️


 एवढं करून मिळणार तरी काय?

 म्हणूनच,

 जीवन प्रवासातले सुख घ्यावे, आनंद नवे शोधावे,

 येणार अडचणी, लढतांना नसेल कोणी सोबती,  जाऊ नका हरवूनी... दुःखा मागे सुखं येईलचं हा विश्वास करोनी...


 दुःखाच्या वादळात हरवून न जाता जिंकण्याचा घ्यावा ध्यास ,

 जीवन हा सुंदर प्रवास  

  योग्य रुपी धरूनी कास  

तरच प्रत्येक क्षण जीवनाचा होईल खास ...😊

 मनमुराद हसून घ्या,वाटलं तर थोडं रडून घ्या, थोडं स्वतःसाठी जगून घ्या,

आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदाने वेचून घ्या ... जीवन एक सुंदर प्रवास , अनुभवी मिळतो खास..

असाचं असावा जीवन जगण्याचा अंदाज...  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational