जिद्द
जिद्द
जिद्द
काळ्या कभिन्न रात्री सुध्दा जिंकण्याची जिद्द हवी।
उंच अस्मानी विहारताना, पडण्याची न कधी भीती हवी॥
अपयश आले परत परत, तरी हार नाही मानणार मी।
पडत, पडत, तरी चढत, चढत, ध्येयाचे शिखर सर करणार मी॥
नेम चुकू देत कितीही माझे, अंतिम लक्ष्य माझेच असे।
चुकता, चुकता, सावरण्याचे तंत्र मला मला अवगतची असे॥
अपयशाने खचून जाईन, असा भ्याड नव्हतो कधी मी।
खेचून आणीन विजयश्रीला, शूरवीर शिरोमणी मी॥