झुंज
झुंज
कोंबड्यांची झुंज जुंपली बाजारी
उभे राहुनी सर्व पाहती शेजारी
अलौकिक हा खेळ चाले इर्षेचा
क्षण क्षण भासे सर्वांना हर्षाचा...
या खेळाची अवीट गोडी
जो तो चाखे मोठ्या ऐटीत
एक मेका युगे हिणविती
संधी साधून दाटीवाटीत...
अनामिक चित्रकार तो कोणी
कोणास नाही ठाऊक
चितारुनी ठेविले प्रसंग चित्र हे
जनास करण्या थोडे भावुक....!