झाड
झाड
झाडांच्या दुनियेमधले
त्यागाचे मर्म कळावे
जमिनीवर राहून नेहमी
आकाशी कर्म करावे
कोसळता चंचला घात
जरा ढळू न द्यावा तोल,
पानांनी गळतांनाही
ती गिरकी घ्यावी गोल
पांथस्थे द्यावी छाया
डोईवर असता जाळ,
फांद्यांवर घेता घाव
तुटते ना हिरवी नाळ
झाडांचे घेऊनी रंग
रंगीत होऊनी गावे
शिशिराच्या पानगळीत
वासंतिक होऊन जावे