जगभर किर्ती..
जगभर किर्ती..
जगभर तुझीच किर्ती...
राष्ट्रपिता कोणी म्हणती महात्मा
महान अशी ही मुर्ती,
करतो वंदन तुला महात्म्या
जगभर तुझीच किर्ती
देशासाठी वेचलेस आयुष्य
आफ्रिकेत ही तुझी कामगिरी
घेऊन अवतार ये अजूनी
पुन्हा या धरती वरती...
सत्य अहिंसेची शिकवण तुझी
सत्याग्रही तूच महान
गाती सारे तुझे गुणगान
प्रणाम तुजला करती...
पाहिलास तू फडकता तिरंगा
तरीही गोळ्या छातीवरती
शब्द अखेर चे हे राम
गेलास कायमचा वरती...
गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड

