Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Jyoti gosavi

Inspirational Others

2  

Jyoti gosavi

Inspirational Others

जाणाऱ्या 2022

जाणाऱ्या 2022

1 min
43


जाणाऱ्या 2022

 तू असा कसा रे दुष्ट

 आमचे कित्येक हिरे 

या वर्षात झाले नष्ट 


आमचे बाबासाहेब पुरंदरे

 स्वर्गात करता आहेत

 शिवव्याख्यान माला 

आणि छत्रपती शिवाजींचा

 जाज्वल्य इतिहास 

ओरडून सांगत आहेत

 तिथल्या जगताला 


आमची गान कोकिला लतादीदी 

तिथे रंगवते आहे मैफल

आणि तिच्या आठवणीने

 आम्ही इकडे पृथ्वीवर विकल 


पृथ्वीवरील देव आता

 आला आहे स्वर्गात 

रमेश देव म्हणतात त्याला, 

 त्याची ऐट त्याचा रुबाब

 वेगळीच होती एक बात

आमचा विक्रम गोखले

 अभिनयाचे विद्यापीठ

 घाबरत नव्हता कधीच

 कोणाला 

बोलणे स्पष्ट आणि धीट

सावरकरांची भक्ती नसानसात भिनलेली 

आणि  सैनिक बांधवांसाठी

 सामाजिक बांधिलकी जपलेली

मांडली आहे का त्यांनी

 स्वर्गात 

अभिनयाची कार्यशाळा

 लक्ष देऊन शिका नीट

 नका करू कंटाळा

 आता वर्षाच्या अखेरीला

 नेलीस हिरावून हिरा बा

 हिच्या पोटी पुत्र हिरा

 अशी ती सगळ्यांचीच बा


 येणाऱ्या 2023 नववर्षा

 कर सर्वांवर सुखाची बरसात 

उद्याच्या उगवणाऱ्या दिनकरा 

नमन तुला जोडूनी दोन्ही हात


Rate this content
Log in