जागतिक महिला दिवस
जागतिक महिला दिवस
स्मरण त्यागाचे, स्मरण शौर्याचे,
स्मरण ध्यासाचे, स्मरण स्त्री पर्वाचे....
स्त्री मध्ये असते शक्ती अपार,
स्त्री आहे या सृष्टीचा आधार,
करा स्त्रीचा नेहमीच सन्मान...
कारण तिच आहे प्रत्येकाच्या जीवनाचे सार....
वात्सल्याची मूर्ती ती,
प्रेमाचा सागर ती,
अखंड खळाळत वाहनारा
मायेचा निर्झर ती.....
नात्यांना प्रेमाच्या रेशमी
धाग्यात गुंफणारी व्यक्ती
म्हणजे स्त्री....
तुझ्या उत्तुंग भरारी पुढे,
गगनही ठेंगणे भासावे,
तुझ्या विशाल पंखाखाली,
विश्व ते सारे वसावे...
ती म्हणजे थंड वाऱ्याची झुळूक,
तर कधी धगधगती ज्वाळा...
म्हणूनच अनेकांच्या
आयुष्याला मिळतो
चंदेरीसोनेरी उजाळा....
ती आहे म्हणुन सारे विश्व आहे....
ती आहे म्हणुन सारे घर आहे....
ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत....
आणि केवळ ती आहे, म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे....
तिचा सन्मान करणे
हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे....
तूच दुर्गा, तू भवानी
अवघ्या संसाराची तूच जननी....
तू भार्या, तू भगिनी,तू दुहिता, प्रत्येक वीराची माता....
तू नवयुगाची प्रेरणा
या जगताची भाग्यविधाता....
नारी हीच शक्ती आहे नराची,
नारीच हीच शोभा आहे घराची,
तिला द्या आदर, प्रेम, माया...
घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा...
नेहमी करते केवळ त्याग,
दुसऱ्यासाठी घेते ती कष्ट फार,
मग तिलाच का सगळा त्रास,
जगू द्या तिलीही अधिकाराने
करा तिचा सन्मान....
मुलीच्या निखळ प्रेमाला सलाम,
आईच्या नि:स्वार्थ त्यागाला सलाम,
बहिणीच्या प्रेमळ मायेला सलाम...
स्त्री मध्ये दडलेल्या
असामान्य स्त्री शक्तीला सलाम....
जगभरात आपल्या देशाच नाव प्रगतीच्या शिखरावर
नेणाऱ्या प्रिय सख्यांना...
कुटुंबाच्या चौकटीतून बाहेर पडून...
दुश्मनांच्या नजरेला नजर भिडवून...
उभ्या ठाकणाऱ्या रणरागिणींना...
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...