Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sanjeev Borkar

Others

3  

Sanjeev Borkar

Others

इंद्रधनु

इंद्रधनु

1 min
379


जीवनाच्या वाटेवरती

नाही कशाची कमी

प्रत्येक पात्र निभावती

जीवन एक रंगभूमी


ऊणे- दुणे सारेच सोडून

करावी लागते मनधरनी

परिस्थितीशी संघर्ष करत

राहावे लागते ढाल बनुनी


घ्यावी लागते कधी कधी

उंचच उंच गगन भरारी

जीवाला जीव लावत

व्हावे चांदणे, कधी परी


आलाच हुंदका जर

अश्रू पापणीत लपवावे

आयुष्य जगतांना

मुंगी होऊन साखर खावे


वृद्ध मानसाकरिता

व्हावे आधार , दुलई

सुनेनी व्हावे मुलगी

सासूने व्हावे आई


जीवनाच्या रंगभूमीवर

प्रत्येक पात्र रंगवावे

इंद्रधनुचे रंग भरुनी

जीवन  सुंदर जगावे


Rate this content
Log in