इंदिरा संत
इंदिरा संत
1 min
162
इंदिरा संत
विश्व कवितेचे
शब्द ममतेचे
नव्हती खंत ...
दिवस आज
जन्म दिन असे
मनावर ठसे
कविता साज....
त्यांचा स्वभाव
असे शांत मन
कविता चिंतन
मनात भाव....
ती चंद्रकोर
तेजस्वी भासते
समई तेवते
देवा समोर
कविता त्यांची
वाचलीच जाते
अभ्यासली जाते
उच्च स्थानाची...
लेखन सेवा
सिध्दांत जाहला
जनांस लाभला
साहित्य ठेवा ...