Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

BABAJI HULE

Others

4.5  

BABAJI HULE

Others

II पारदर्शकता II

II पारदर्शकता II

1 min
371


विश्वास आणि प्रामाणिकपणा यांची युती झाली कि जन्म होतो तो पारदर्शकतेचा 

मग नात्यांची किंवा संस्काराची गरज नसते ती एकमेकांची आत्मीयता जपण्याचा 

समाज मध्यभागी केंद्रित असावा  मग ते सरकार असो कि एखादी संस्था 

स्वार्थाशिवाय कामाची दाखवावी एखादी झलक  मारु नयेत नुसत्याच जनहिताच्या गप्पा 

ज्याचे काम त्याला करू दयावे अधिकाराशिवाय आपण कशाला माराव्यात बेडूक उड्या 

अति आत्मविश्वास आणि अहंमपणा करावा कमी नाहीतर उडतील आपल्याच खोट्या वावड्या !!


ज्ञानी आणि संयमी लोकांनी विचारावे स्व-मनाला आपलीच आपल्यापासून दूर का जातात ?

हृदयाला हि जाणीव व्हावी थोडी आपल्या चुकांची महंती आपल्या-आपल्यात तणाव का होतात 

निष्पाप लोकांना का वंचित ठेवावे करून लपवाछपवी त्यांच्याच  माहिती आणि अधिकाराची 

एखाद्या इच्छित नवख्याला विश्वासाने द्यावी जबाबदारी आपल्याला न झेपणाऱ्या कामाची 

शोधावी नवी वाट एका नव्या कार्याची, घमेंड बिलकुल नसावी त्या एकाच खुर्चीची 

योग्य वेळेची नसेल आपल्यात निर्णय क्षमता परंतु माहीती द्यावी सर्वाना परदर्शकतेची !!


जबाबदारीची जाणीव असते प्रत्येकाला परंतु पारड्याचे झुकते माप नेहमीच असावे विश्वासाला 

कामे होतील, लोकही पुढे येतील परंतु लाचारी आणि भ्रष्टाचाराची साथ सोडावी चिकटलेल्या पदाला

सरकर काय आणि संस्था काय समाज व्यवस्थेमुळेच येतो त्याला अर्थ 

आणि कामात पारदर्शकता नसेल तर तुमची अभिमानी कृत्ये जातील व्यर्थ !  


Rate this content
Log in