Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

BABAJI HULE

Others

4  

BABAJI HULE

Others

II निरोप माझा सरत्या वर्षा -------

II निरोप माझा सरत्या वर्षा -------

1 min
345


कडूगोड आठवणींची गोळाबेरीज करतो आता 

आणि निरोप हा माझा या सरत्या वर्षाला,    

भूतकाळात जाऊन येतो मी 

रंगवतो स्वप्नांचे मनोरे येणाऱ्या भविष्याला  II १ II

 

बऱ्याच छोट्यामोठ्या स्वप्नांचा चुराडा झाला 

आता मात्र नवीन वर्षाचे गणितं मांडतो मनात,

प्रचंड आशावादी असल्याने ठरले सर्व मृगजळ 

परंतु आता अपेक्षित आहे होईल काही चमत्कार  II२ II

 

येणारा प्रत्येक दिवस नवीन आशा पल्लवित करतो

परंतु उगवणारा सूर्य मावळतीला जातोच,

सरकारी योजनाही वर्षानुवर्षे चालतातच 

तरीही हताश न होता त्या पूर्ण होतातच   II३ II

 

करूयात नवीन वर्षाचा नवीन संकल्प 

गरज आहे ज्याची जाणीव झाली या वर्षात 

मोबाइल सारख्या डिजिटल युगांत 

संवाद वाढवून असणारी नाती जपुयात  II४ II

 

सामाजिक जाणीवेच बंधन ठेवताना 

मित्र आणि पुस्तकांची मैत्री वाढवूयात 

स्वतःला आणि कुटुंबाला वेळ देऊन

मस्त निसर्गाची भटकंती करून स्मृती जपुयात  II५ II

 

सूर्याचे उगवणे थांबणार नाही 

तर चंद्राचे मावळणेही थांबणार नाही 

येणारी जाणारी वर्षे येत-जात राहतील 

परंतु २०२० मात्र कायम लक्षात राहील II ६ II


Rate this content
Log in