Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

BABAJI HULE

Others

4  

BABAJI HULE

Others

II गोड शब्दांचे विकल्प II

II गोड शब्दांचे विकल्प II

1 min
178


आनंद आणि समृद्धीचे प्रतीक,

रंगीबेरंगी तिळगुळाची रेलचेल,

नवचैतन्य आणि माधुर्याची खाण,

सण मकर संक्रातीचा म्हणजे मराठीचा मान.

नैराश्य आणि कटुता दूर करून,

जुन्या आठवणींची शिदोरी घेऊन,

आपापसातील मतभेदांना दूर करूया !

जुनीच नाती नव्याने अतूट करूया !!

विसरून जाऊ क्षणभर सारे,

आयुष्याच्या वळणावरील भले आणि बुरे,

जागवूया माणसातील हरवलेली माणसुकी,

जगण्याची परिभाषा बदलायला हवी नक्की.

मनातील कडवटपणा बाहेर जाऊ द्या,

तोंडातील शब्दांचा गोडवा ओठांवर येऊ द्या,

मकर संक्रमणानंतर वाढतं सूर्याचं प्रखर तेज,

इच्छातृप्तीने चेहरा नेहमी दिसावा तुमचा सतेज.

आठवण स्नेहाची पण कणभर तिळाची,

गोडवा गुळाचा पण मणभर प्रेमाची,

करावे नेहमी ख़ुशी, शांती आणि प्रेमाचे दान,

मुस्करत्या चेहऱ्याने करावा मोठ्यांना प्रणाम.

असे हे क्षण नवं वर्षारंभीचे,

असावे मनी ध्येय विकासाचे,

नवयुगाला साद घालणारे,

परिवर्तनांचा गोडवा गाणारे.

तिळगुळ घ्या गोड गोड बोला !

उर्वरित आयुष्यातील प्रत्येक संक्रातीला !!

करावे नेहमीच नवे नवे सुंदर संकल्प,

संक्रातीशिवायही असावे गोड शब्दांचे विकल्प.        


Rate this content
Log in