हवीस तू
हवीस तू
हवीशी तू मला
माझी प्रिया
मज ठाउक हे बहाणे
सांज मनाची सरतच नाही
किती कठीण तुझिया वाचून राहणे
हवीशी तू मला
होऊनि फूल गुलाबाचे
वेणीत माळून गजरा
श्वासात भरीन
सुगन्ध मोगऱ्याचे
हवीस तू रुणझुणत्या वाऱ्यामध्ये
हवीस तू कोसळत्या पावसामध्ये
प्रेम करण्या मजवरी
हवीस तू