Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shrikant Kumbhar

Others

5.0  

Shrikant Kumbhar

Others

हृदयाचा फोन...

हृदयाचा फोन...

1 min
522


भल्या सकाळी हृदयाचा माझ्या फोन आला

गूज त्याच्या मनीचे ते सांगू लागले मला

"मालक, तुमच्यासाठी दिन-रात चालतो मी

पण... माझ्यासाठी एक तास ही चालत नाही तुम्ही

किती काळ अस चालायचं ...?

एकाच बाजूने सांधायच ...?

थांबलो पलभर मी जरी, तर थांबल तुम्ही

थांबलात तुम्ही तरी, अडखळेन थांबेन मी

त्यापेक्षा करूया दोघे असे काही

थांबायची वेळच यायची नाही...

एकत्र चालुया दोघेही अन्...

एकत्र जगूया आनंदाने जीवन

उलटुन गेली नाही अजून वेळ

संपत आला नाही अजून खेळ

उद्या सकाळी अनशेपोटी चाल तू एक तास

वर्ष, महिने, दिवसही चालेन... तुझ्यासाठी तासनतास"


Rate this content
Log in