Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

हॉलंड

हॉलंड

1 min
117


हाॅलंड मधील फुले पाहताना

मी फुलांकडे पाहतच राहिले

रंगीबेरंगी ही निसर्ग किमया

डोळ्यात, मनात साठवू लागले....


सावकाश हळूवार हात लावला

या लाल,पिवळ्या,केशरी फुलांना

सुवास या सुमनांचा अंतरात

साठवून ठेवला कळी फुलून पाहताना....


सुरेख रंगसंगती या सृष्टीची

पाकळी ती मोहक सुमनांची

आकार पुष्पांचे निरखताना

उधळण होते इंद्रधनुष्याची.....


वार्‍यावर ही सुमने डोलताना

सृष्टीशी हितगुज करिती जसे

आतून प्रफुल्लीत होती सुमने

धरणीला भेटण्या आतूर असे....


ट्युलीप फुलांचा मंद,धुंद सुगंध

आसमंती दाही दिशा दरवळू लागे

पाकळी पाकळी उमलताना

मी फुलले ,मी फुलले सर्वांस सांगे...


गार्डनला भेट देताना नजर ठरत नाही

अनेक रंगी फुले पाहून वसुधा खुलली

सृष्टीच्या हा अनमोल खजिना देखणा

वसुधेवर फुले फार शोभूनच दिसली...


Rate this content
Log in