Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Kadam

Inspirational

3  

Prashant Kadam

Inspirational

होळी

होळी

1 min
243


आज नाही सोडणार 

रंग मी लावणाार

होली है, एवढंच बोलणार

रंगांची उधळण करणार

होळी साजरी मी करणार

होळी साजरी मी करणार 


आहे कोरोना, नाही घाबरणार 

मात त्यावर मी करणार 

कोरोना होळीत जाळणार

समूळ नायनाट त्याचा करणार

होळी साजरी मी करणार 

होळी साजरी मी करणार 


रंग हे सुंदर, जग ही सुंदर 

सौंदर्य त्याचं मी राखणार 

संस्कृती आपली जपणारं 

अवडंबरांचं दहन करणार 

होळी साजरी मी करणार 

होळी साजरी मी करणार 


रंगांचे मोल खुलवणार 

जीवनात आनंद आणणार

दुःखाला दूर दूर लोटणार

नैराश्य पळवून लावणार 

होळी साजरी मी करणार 

होळी साजरी मी करणार


आज नाही सोडणार 

रंग मी लावणार

होली है, एवढंच बोलणार 

रंगांची उधळण करणार 

होळी साजरी मी करणार 

होळी साजरी मी करणार. 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational