होकार
होकार
मी चंद्र नभीचा
तू सखे चांदणी
ये माझ्या अंगणी
सुख बहरे जीवनी
मी रिती ओंजळ
तू प्रीतीचा सागर
दे जागा हृदयात
लिहू प्रेम कहाणी
मी वारा वेडा
तू झुळूक मंद
दे सोबत मजला
दरवळेल प्रेमाचा गंध
मन खुळे तुझ्यासाठी
प्रेमाचा कर स्वीकार
विचार कर माझा सखे
दे एकदा होकार