हो मी सावरले!
हो मी सावरले!

1 min

14
विसरले जात नसलेले क्षणही
किती लवकर ओलांडून गेलास ना तू?
बावरू न देता त्या मनालाही
सावरून घेतलंस तू!
तुझ्यातून सावरताना जणू
एक माझेच रूप खुलले
या जन्मात तरी मी आता
स्वतःभोवतीच रुळले!