Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

AnjalI Butley

Abstract Tragedy

2  

AnjalI Butley

Abstract Tragedy

हिरवे पाणी

हिरवे पाणी

1 min
65


पाण्या तुझा रंग कोणचा?

ज्याच्यात मिसळेल त्याचा

असायचे उत्तर माझे आधी!

आकाशाचे निळे प्रतिबिंब

उतरता माझ्यात निळा मी दिसे!

हिरवी झाडे अवती भवती असता

प्रतिबिंबीत मायावर होता हिरवा मी दिसे!

आता पडत नाही कोणाचे प्रतिबिंब माझ्यावर

तरी मी हिरवा दिसे!

वाढली एवढी जलपर्णी माझ्यावर

विसरूनच गेलो माझा नितळ रंग!

घेऊन तो जलपर्णीचा भार हिरवा मी दिसु लागलो!

हिरवे पाणी हिरवे पाणी ओरडू लागले लोक

भार त्या जलपर्णीचा काढण्या कोण घेईल पुढाकार?

करेल कोण मुक्त मला ह्या हिरव्या पाण्यातून आता?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract