Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

हे वर्ष अमृताचे

हे वर्ष अमृताचे

1 min
151


साल नवे उघडले

नवा इतिहास घडे

झाली स्वातंत्र्य वीरश्री

सरे वर्ष अमृताचे


वीर अथक झटले

बलिदान प्राण दिले

भारताच्या स्वातंत्र्याला

अमृताचे दान मिळे


साहसाची धाडसाची

आठवण सारे ठेवू

स्मरु समर्पण त्यांचे

स्वातंत्र्याची धुरा जपू


कर्तव्याची ठेवू जाण 

सारे सैनिकांना स्मरु

उरी ठेवू स्वाभिमान 

ध्वज उंच फडकवू


झाला अमृत सोहळा

स्मरुनीया वीर थोर

वर्ष नवेही आणेल

सुख आनंदाला पूर


Rate this content
Log in