हे ही दिवस जातील....
हे ही दिवस जातील....
हे ही दिवस जातील
आशा मनात आहे,
काळजी घ्या यथायोग्य
दिवस बदलत आहे...
हे ही दिवस जातील
खूणगाठ मनात बांधा,
माणुसकी, स्नेहभावाचा
पुल आता ताे सांधा...
हे ही दिवस जातील
प्रगाढ श्रद्धा ईश्वरावर,
पालटेल ताे आपले दिवस
जीवन चालते विश्वासावर..
हे ही दिवस जातील
घ्या अंतरंगातून बाेध,
चाळत राहा स्मृतींची पाने
मिळेल काही घ्यावा शाेध..