गुरु
गुरु
आज आलो इथवरी, प्रवास मार्गी चालत आम्ही.
चाललो जरी मी, परी मार्ग दाखवला तुम्ही.
केलेत घाव शिक्षेचे, दिले शिक्षण आम्हा.
शब्द बुद्धी संपती सारं तुमचं, बाकी काय बोलू तुम्हा.
जे होतं ते सगळं दिलंत, केलंत कणखर माझ्या नावाला.
खरी मेहनत कोणाची, कधी कळेल या साऱ्या गावाला.
सगळं काही शिकवलत, अगदी पुस्तका बाहेरच सुध्दा.
तयारीही तशीच करून घेतलीत, हाच तुमच्या अजेंडयाचा मुद्दा.
विचार घेऊनी तुमचे, आयुष्याच्या संकटांना पुरून उरु.
सार्थक झाले जीवनाचे, लाभले तुम्हा सारखे गुरु.