गुरु तत्वाचे विचार
गुरु तत्वाचे विचार
अज्ञानाचे अंधकार
दुर करते जी शक्ती |
देते प्रेरणा आम्हाला
करण्यास गुरु भक्ती ||१||
अंधारास उजेड़ात
खोट्यातून खरे सार |
मृत्यूतून अमृत हे
गुरु तत्वाचे विचार ||२||
शब्द ब्रम्ह जाणकार
श्रेष्ठ ब्रम्ह आचरण |
करे शिष्यास समर्थ
येई त्याचे जो शरण ||३||
*गुरुर्ब्रम्हः* रुपमध्ये
आई पहिली निष्पत्ती |
ब्रम्हा सारखी आईने
होते मानव उत्पत्ती ||४||
*गुरुर्विष्णूः* आहे बाप
गुरु दुसरा भुषण |
विष्णू सारखा करतो
बाप घराचा पोषण ||५||
*गुरुरेवंः महेश्वरः*
गुरु तिसरी धारणा |
शिस्त शंकर सारखी
देतो ज्ञानाची प्रेरणा ||६||