Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Action Classics Inspirational

3  

Prashant Shinde

Action Classics Inspirational

गुलदस्ता

गुलदस्ता

1 min
126


अनाकलनीय....!

गुलदस्ता

(स्वाभाविक प्रतिक्रिया)

शब्द अगदी साधा

अर्थही अगदी साधा

न समजणारा

न उमजणारा

पण आता

या शब्दाचा अर्थच बदलला

काही काही शब्द

पण भलतेच द्वाड असतात

ते आपले अर्थ

कोणाच्या वाणीतून अवतरले

यावर अवलंबून ठेवतात

काही शब्द

गुरू मंत्रा सारखे

पावित्र्य घेऊन

जन्मभर आपले वर्चस्व

अर्थास साजेसे

जपून ठेवतात

सार्थ ठरवतात

पण काही शब्द

वळचणीला पडतात

वाचाळ वीरांच्या

थापाड्यांच्या

खोटारड्यांच्या

मुखातून जेंव्हा ते बाहेर पडतात

तेंव्हा सारीच गणित बदलतात

अर्थाचे अनर्थ होतात

आणि

अनाकलनीय अस

काही असत

अस

वाटनास होत

समजत उमजत अगदी

मनात ठसत

अनाकलीय म्हणजे जे जे

अनाकलनीय असत

ते सारच

अनाकलनीय होऊन जातं

पटत

खरचं खूप काही जीवनात

अनाकलनीय अस

शिल्लक आहे

ज्याचा ज्ञान होणं

गरजेच आहे

ते ते सर्व अजून

बाकी आहे.....!

उदाहरणार्थ

आमचं ठरलय...

आम्ही लक्षात ठेवलय..

पूर्वी परीक्षेत

कोण कोणास बोलले

अशा आशयाचे प्रश्न असायचे

आम्ही सरळ ठोकून द्यायचो

राम्याने लक्षाला म्हंटले..!

तेंव्हा राम,लक्ष्मण

यांचे अर्थ ,ते कोण हे

न समजल्यामुळे गौण असायचे

वाटायचे रामूनेच

लक्षाला हटकले असावे

आणि पैकीच्या पैकी गुण मिळायचे

कारण

गुरुजींना रामू ही माहीत असायचा

आणि लक्षाही माहीत असायचा

आज काळ बदलला

वेळ ही बदलली

पण संदर्भ मात्र तेच राहिले

आजही

अर्थाचा अनर्थ सहसा होत नाही

त्यामुळे

गुरु शिष्य परंपरा

अबाधित असल्याचे समाधान मिळते

जीवनाचे रहाटगाडगे अविरत

चालू राहते...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action