Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Supriya Devkar

Abstract

3  

Supriya Devkar

Abstract

गुलामगिरी

गुलामगिरी

1 min
415


अन्यायाविरूद्ध आवाज उठवा

नका सोसू गुलामगिरी 

सोशिकतेच्या तोडून बेड्या 

सत्याचा चढवा मुकुटशीरी॥१॥


चाली परंपरांचे जंजाळ

गुरफटून कशास बसावे

नव्या विचारांसोबत जात

सलोख्याने एकत्र हसावे॥२॥


पुढारलेल्या विचारांची 

उभा करावी उंच गुढी 

संस्कारांना न विसरता 

निर्माण करावी नवी पिढी॥३॥


थांबवा गुन्हेगारीला

होईल सुरळीत मग सारे

खत पाणी नका घालू

अडमुठे वागणे नाही बरे॥४॥


पैसा असावा गरजेपुरता 

हाच ध्यास बाळगा मनी 

हव्यासाच्या मानगुटीवर 

लालसेचा चढे धनी॥५॥


नका शोषणाचा भाग बनू

उघडा मनाची दारे सदा

खोळबंलेल्या भावनांचा 

होऊदे निचरा सदा ॥६॥


अन्यायाची तिडीक उठू दे

होऊ दे धमन्यांना गरम

अधःपतन करणार्यांना 

वाटू दे थोडीशी शरम॥७॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract