Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Rajesh Sabale

Others

2  

Rajesh Sabale

Others

गुलाबी हवा

गुलाबी हवा

1 min
1.3K


प्रीत प्रेमाचा फुलवा,

भर अंगात गुलाबी हवा।

हा गुलाबी गारवा,

प्रेमाची उबदार हवा।। 

हा प्रीतीचा गारवा,

उगा मनात भरवी धडकी।

मला उघडून ठेवा,

प्रेमाची उबदार खिडकी।। 

मी येऊन बसते,

शेजारी पलंगावरती।

कुणी झोपाळा झुलवा,

प्रीतीच्या वाऱ्या वरती।। 

 लई दिसानं फुललाय,

प्रीतीचा गुलाब दारी।

आज खुशीत दिसतेय,

लई बाई इकडची स्वारी।। 

रोज अशीच होऊ द्या,

प्रेमाची बरसात राया।

उगा कशाला घालताय,

प्रीतीचा गुलकंद वाया।।


Rate this content
Log in