गुढीपाडवा
गुढीपाडवा
साखरगाठीचा गोडवा
कडुलिंबाचा पाला
नववर्षाचा सण
गुढीपाडवा आला
सुरू होता
मराठी नववर्ष
मनी दाटला
आगळा हर्ष
नवा सण
नवा दिवस
जगण्यास मिळे
नवी आस
आनंदाला येते
चैत्रात उधळण
जीवनास देई
वेगळे वळण
पानाफुलांचे तोरण
लागते दारी
नक्षीदार रांगोळी सजते
सकाळच्या प्रहरी
नवचैतन्याची गुढी
उभी दारोदारी
पंचपक्वानाची थाळी
सजते घरोघरी