गुढी पाडवा
गुढी पाडवा
मराठी वर्ष
गुढी पाडव्याला
जाहला मनाला
बहुत हर्ष ...
गुढी दाराची
समृध्दी प्रतिक
वृत्ती ती सात्विक
ठेवा मनाची ...
पुजा गुढीची
करू मनोभावे
सुखास मागावे
इच्छा मनीची
पाडवा सण
मज अभिमान
मराठी सन्मान
आनंद कण ...
आज दिनाला
निश्चय करूया
चांगले वागूया
मोद मनाला ...
या नतद्रष्ट
वृत्तीचा बिमोड
जिरवूया खोड
घेऊया कष्ट ...
गुढी उभारू
सद् विचारांची
दुष्ट विकारांची
दूरच सारू ...