गृहिणी
गृहिणी
गृहलक्ष्मी ती मानाची
सून वडीलधा-यांची
पत्नी असे भर्ताराची
आई असे लेकरांची
होई उषःकाल तिचा
भल्या पहाटे सकाळी
हात चाले भरभरा
सडा घालूनी रांगोळी
स्वच्छ शरीरमनाने
स्वयंपाक करीतसे
सा-या आवडीनिवडी
मनोमनी जाणतसे
आला गेला पै पाहुणा
हास्य विलसे वदनी
गोड शब्दांनी विचारी
उणे न काही वचनी
सारा भार शिरी पेले
गुणी असे ती गृहिणी
कर्तव्यच आहे माझे
सेवाभाव असे मनी