गर्दी मधे
गर्दी मधे
1 min
174
आमचे आम्हीच झालो एकटे गर्दीमधे
अंगही चोरीत नाही चोरटे गर्दीमधे
पांढऱ्या टोपीतल्यांना हार मानांचे तुरे
हासरे ते हार झाले छाकटे गर्दीमधे
आपला अंदाज आहे सूर्यही घामाजला
सूर्यही शोधेल छोटे खोपटे गर्दीमधे
थोरला सांगेन 'फाडू कोथळा हा बोचरा!'
कोयता घेतील हाती धाकटे गर्दीमधे
स्वैर वृक्षालाच त्याची वंशवेली माहिती
वाढते ते स्वैर त्याचे रोपटे गर्दीमधे