Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sharad Kawathekar

Others

4.0  

Sharad Kawathekar

Others

गप्पांचा पाऊस

गप्पांचा पाऊस

1 min
132


रिपरिपत्या संध्याकाळी 

निळ्या सावळ्या मेघाबरोबर

तू यायचीस

येताना गप्पांचा पाऊस घेऊन यायचीस

इतके चिंब भिजनं व्हायचो आपण की

ख-या पावसांच फक्त पडणंच राहायचं 

मग पावसाचा शब्द व्हायचा 

चिंब चिंब भिजायचो

क्षितीज हलकं हलकं व्हायचं 

आजही तशीच संध्याकाळ आहे

रिपरिपती

निळ्या सावळ्या मेघाबरोबर आलीय 

पण.......

यावेळी तू नव्हतीस

गप्पाचा पाऊस नव्हता 

हो, पाऊस होता पण एकटाच 

येवढा कंटाळवाणा प्रवास

करून आलेला पाऊस 

तिकडं तो एकटा 

इकडं मीही एकटाच 

डोळ्यांतला पाऊस मोकळा करतोय 

या रिपरिपत्या संध्याकाळी 


Rate this content
Log in